Dharma Sangrah

काळा पैसाधारकांची माहिती देण्यासाठी ईमेल आयडी सुरु

Webdunia
शनिवार, 17 डिसेंबर 2016 (10:57 IST)
काळा पैसाधारकांची माहिती देता यावी यासाठी केंद्र सरकारने आता ईमेल आयडी सुरु केला आहे. काळा पैसाधारकांची माहिती कोणाकडे असल्यास ते या ईमेलवर माहिती देऊ शकतील अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी दिली आहे. यासाठी blackmoneyinfo@incometax.gov.in असा ईमेल आयडी आहे. या  ईमेलवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून माहिती मिळताच संबंधीतांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. 
 
याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत  बेहिशेबी रक्कम जाहीर करता येणार असून ३१ मार्चपर्यंत ही योजना सुरु राहणार  आहे. या योजनेंतर्गत ५० टक्के कर आणि दंड भरावा लागेल असे त्यांनी सांगितले.  बेहिशेबी मालमत्ता किंवा रक्कम जाहीर करणा-यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments