पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील उस्थी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील भाजप कार्यालयात पक्षाच्या एका नेत्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.
भाजप कार्यालयात ज्या पक्षाच्या नेत्याचा मृतदेह सापडला त्याचे नाव पृथ्वीराज नसकर असे आहे. ते पक्षाचे सोशल मीडिया अकाउंट मॅनेज करायचे. शुक्रवारी रात्री पक्ष कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळून आला.ते 5 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या मुद्द्यावरून भाजपने तृणमूल काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. मात्र, याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून हत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नस्कर याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली अटक केलेल्या महिलेने दिल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
प्राथमिक तपास आणि मोबाईल फोनची माहिती गोळा केल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे. चौकशीत महिलेने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आता या घटनेत आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास सुरू आहे.