Delhi News: देशाची राजधानी दिल्लीत गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर आरोप करत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
तसेच राजधानीतील शाहदरा परिसर शनिवारी विश्वास नगरमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका व्यावसायिकाची दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. तसेच हल्लेखोरांनी जवळपास 9 राऊंड गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यावसायिकाच्या हत्येवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घटनेनंतर व्यावसायिकाला गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, 52 वर्षीय सुनील जैन असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली आहे.