Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाकुंभात स्नान करणाऱ्या महिला व मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

महाकुंभात स्नान करणाऱ्या महिला व मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
Webdunia
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025 (14:50 IST)
महाकुंभात आलेल्या महिलांचे स्नान करतानाचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करुन त्यांची विक्री करणाऱ्या दोन सोशल मीडिया अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाकुंभात आलेला महिला व मुलींचे स्नान करताना व कपडे बदलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचे तपासात समोर आले असून हा महिलांच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे  उल्लंघन असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ALSO READ: सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज दिले
17 फेब्रुवारी रोजी एका इंस्टाग्राम अकाउंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अकाउंटवरून महिलांचे स्नान करतानाचे आणि कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केले जात होते. कंपनीकडून ती चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी माहिती घेतली जात आहे. बुधवारी एका टेलिग्राम चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ALSO READ: रील्स बनवण्याचा छंद बनला मृत्यूचे कारण, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
महाकुंभमेळ्याबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकण्याच्या 10 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 101 खात्यांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे.
या प्रकरणी कोतवाली कुंभमेळ्यातील 26 सोशल मीडिया अकाउंट्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ALSO READ: तुरुंगातील कैद्यांनीही हर हर गंगेचा जयघोष करत संगमच्या पाण्यात केले स्नान, कैद्यांच्या इच्छेचा आदर करून तुरुंगात केली गंगेच्या पाण्याची व्यवस्था
महाकुंभाच्या सुरुवातीपासून, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवा पसरवणाऱ्या 101 अकाउंट्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments