CBSE बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर दिल्लीतही शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्याचा दावा केला जात होता. मात्र आता बोर्डाने याबाबत स्पष्टीकरण जारी केले असून बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या नसल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली नोटीस खोटी आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि पालकांनी नोटीसवर विश्वास ठेवू नये.
शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे CBSE बोर्ड परीक्षा 2024 पुढे ढकलण्यात आल्याचे बनावट परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, बोर्डाने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली बातमी पूर्णपणे खोटी आहे. अशा परिस्थितीत नोटीसवर विश्वास ठेवू नका.