Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तर प्रदेश : शिक्षक इयत्ता सहावीतल्या मुलीसोबत फरार!

crime
, शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (15:30 IST)
उत्तर प्रदेशातील महाराजगंजयेथे नौतवान येथे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा लावण्याची घटना घडली आहे. खासगी शाळेतील एका 45 वर्षाच्या शिक्षकाने इयत्ता सहावीत विद्यार्थिनीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी शिक्षकाच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंज येथे नौतवान  येथील एका कन्या पूर्व माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेतील 45 वर्षाच्या शिक्षकाने पळवून नेले आहे. 
 
सदर घटना 8 फेब्रुवारीची असून मुलगी नेहमी प्रमाणे शाळेत गेली मात्र घरी परतली नाही. त्याच दिवसापासून शाळेतील शिक्षक देखील फरार आहे. अद्याप शिक्षक आणि विद्यार्थिनी फरार आहे. हा शिक्षक नेपाळचा रहिवासी आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून संशयाच्या आधारे शिक्षकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! महाराष्ट्रात दिवसाला 34 बाळांचा गर्भातच मृत्यू