Festival Posters

भारताने फेटाळला शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप

Webdunia
भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा आरोप हा चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
‘भारतीय सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नाही. भारतीय सैन्य फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देते. यंदाच्या वर्षात झालेल्या एकूण शस्त्रसंधीच्या उल्लंघनापैकी दोन-तृतीयांश उल्लंघनाच्या घटना या मागील पाच आठवड्यांमधील आहेत,’ असे विकास स्वरुप यांनी म्हटले आहे.
 
‘पाकिस्तानकडून भारतीय उच्चायुक्तालयातील काही अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला हा आरोप मान्य नाही. आम्ही हा आरोप फेटाळून लावतो. भारतीय दूतावासातील अधिकारी व्यापार आणि अर्थसंबंध यावर दोन देशांमधील संवाद वाढावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना नाहक त्रास दिला जात आहे,’ अशी माहिती स्वरुप यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments