Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंदा कोचर : बॅंकिंग क्षेत्रातील 'स्टार', पद्मभूषण ते सीबीआयच्या अटकेपर्यंतचा प्रवास

Webdunia
रविवार, 25 डिसेंबर 2022 (16:50 IST)
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयनं शुक्रवारी (23 डिसेंबर) अटक केली आहे.
व्हिडीओकाॅन समूहाला 3000 करोड रुपये कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप त्यांच्यावर सीबीआयनं केलाय.ज्यावेळी हे कर्ज देण्यात आलं होतं त्यावेळी त्या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख होत्या.
 
त्यांनी मंजूर केलेली कर्जाची रक्कम त्यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आलाय.
त्यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेत त्यानुसार, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग आणि तेल-गॅस खाण कंपनी व्हिडिओकॉनचे माजी चेअरमन वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्यूएबल्स या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
 
व्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर ही गुंतवणूक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन समूहाला दिलेलं हे कर्ज नंतर एनपीएमध्ये बदलण्यात आलं.
 
राजस्थान ते मुंबई
एकेकाळी चंदा कोचर या भारतीय बँकिंग क्षेत्रातल्या स्टार बँकर होत्या. त्यांनी अगदी कमी कालावधीत फार मोठी झेप घेतली होती.
 
व्यवस्थापन आणि बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या या चंदा कोचर भारतीय महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या होत्या. पण त्यांच्या या बँकिंग कारकीर्दीचा शेवट वाईट ठरला.
 
चंदा कोचर यांची 2009 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या. ''आसमानों की ख्वाहिश रखो लेकिन धीमे-धीमे चलते हुए. रास्ते पर चलने वाले हर एक कदम का मजा लो. ये छोटे-छोटे कदम ही हमारे सफर को पूरा करते हैं." लांबचा प्रवास करायचा असेल तर छोटी छोटी पावलं टाकून आपण आपलं ईप्सित साध्य करू शकतो असं चंदा कोचर यांना सांगायचं होतं.
पण हे बोलताना त्यांच्या बँकिंग कारकिर्दीचा असा अंत होईल याचा विचार देखील त्यांनी केला नसेल.
 
भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये पुरुषांची असलेली मक्तेदारी मोडून संपूर्ण जगात बँकिंग सेक्टरमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चंदा कोचर आता सीबीआयच्या ताब्यात आहेत.
 
चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर पद्धतीने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी सीबीआयने कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या विरोधात गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
 
आज भले ही चंदा कोचर फसवणुकीच्या कारणांमुळे चर्चेत असतील, पण त्यांचा बँकिंग क्षेत्रातला प्रवास थक्क करणारा आहे. यात त्यांचा संघर्ष, त्यांना मिळालेलं यश आणि विविध पुरस्कारांचा समावेश आहे.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेल्या चंदा कोचर यांनी त्यांचं शालेय शिक्षण जयपूर मध्ये पूर्ण केलं. त्यांचे वडील रूपचंद अडवाणी हे जयपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून कार्यरत होते तर त्यांची आई गृहिणी होती.
 
चंदा कोचर 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांचे पती दीपक कोचर यांच्या ऑफिशियल ब्लॉगवर याविषयी लिहिलंय.
 
त्यांनी पुढे मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून बी. कॉम पूर्ण केलं.
 
1982 मध्ये डिग्रीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथून कॉस्ट अकाउंटन्सीचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून आपलं मास्टर्स पूर्ण केलं. त्यांच्या मॅनेजमेंट स्टडीज मध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवल्याबद्दल त्यांना वोकहार्ड्ट गोल्ड मेडल आणि अकाउंटन्सी मध्ये जेएन बोस गोल्ड मेडल मिळालं. 1984 मध्ये त्यांनी आयसीआयसीआय बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. भारतीय उद्योगांना प्रकल्प आधारित वित्तपुरवठा करावा यासाठी संयुक्त उद्यम वित्तीय संस्था म्हणून आयसीआयसीआय या बँकेची 1955 मध्ये स्थापना करण्यात आली. 1994 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडे स्वतःचा मालकी हक्क आला त्यावेळी चंदा कोचर यांना असिस्टंट जनरल मॅनेजर बनवण्यात आलं.
 
बँकेच्या सीईओ ते पद्मभूषण
पुढे त्या यशाची एकएक शिखरं पादक्रांत करत राहिल्या. डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर आणि 2001 मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट बनल्या.
 
यानंतर त्यांच्याकडे कॉर्पोरेट व्यवसायाची जबाबदारी देण्यात आली. पुढे त्या चीफ फायनान्शियल ऑफिसरही बनल्या.
 
सरतेशेवटी तो दिवस उजडलाच.. 2009 च्या मे महिन्यात चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि एमडी बनल्या. चंदा कोचर यांच्या नेतृत्वात बँकेने रिटेल बिजनेस मध्ये पाऊल ठेवलं. यात बँकेला मोठं यश मिळालं.
 
चंदा कोचर यांची गुणवत्ता आणि बँकिंग क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना 2011 मध्ये तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं.
 
आयसीआयसीआय मध्ये असताना त्यांच्याकडे भारत आणि परदेशातील कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
 
त्यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँक भारतातील खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक बनली. चंदा कोचर यांना वर्षाला 5.12 कोटी रुपये पगार मिळत असल्याचं त्यांच्या पटीने एकेठिकाणी सांगितलं होतं.
 
फोर्ब्स मॅगझीनच्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीतही त्यांचं नाव झळकलं होतं.
 
पदाचा गैरवापर
आयसीआयसीआय बँकेचा कार्यभार सलग 9 वर्ष सांभाळणाऱ्या चंदा कोचर यांच्या कारकिर्दीला 2018 मध्ये उतरती कळा सुरू झाली.
 
त्यांनी व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना वैयक्तिक लाभाचा विचार करत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. हे प्रकरण इतकं वाढलं की 4 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
 
चंदा कोचर यांचा कार्यकाळ मार्च 2019 मध्ये संपणार होता.
 
आपल्या पतीला आर्थिक लाभ व्हावा या हेतूने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे आरोप गेल्या वर्षी मार्चमध्ये लावण्यात आले. इंडियन एक्सप्रेस मध्ये मार्च महिन्यात छापून आलेल्या बातमीनुसार, आयसीआयसीआय बँकेने एप्रिल 2012 मध्ये व्हिडिओकॉन समूहाच्या पाच कंपन्यांना 3250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.
 
प्रकरण बाहेर कसं आलं?
अरविंद गुप्ता यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण माध्यमांसमोर उघडकीस आलं. अरविंद गुप्ता हे व्हिडिओकॉन समूहातील गुंतवणूकदार होते.
 
गुप्ता यांनी 2016 मध्ये आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन समूह यांच्यातील व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कोचर यांच्या पदाच्या गैरवापराबद्दलची आणि हितसंबंधांची माहिती दिली.
 
पण अरविंद गुप्ता यांच्या तक्रारीकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. त्यानंतर त्यांनी दीपक कोचर यांनी 2010 मध्ये प्रमोट केलेल्या एनयू पॉवर रिन्यूएबल्स कंपनीबद्दल माहिती गोळा केली.
 
मागच्या वर्षी इंडियन एक्स्प्रेसने या आर्थिक अनियमिततेचा रिपोर्ट छापला तेव्हा राष्ट्रीय माध्यमांमध्ये हे प्रकरण चर्चेचा विषय बनलं.
आयसीआयसीआय बँकेने यावर स्वतंत्र तपास करण्याचा निर्णय घेतला. बँकेने 30 मे 2021 रोजी बोर्ड व्हिसल ब्लोअरच्या आरोपांची 'तपशीलवार तपासणी' करण्याची घोषणा केली.
 
पुढे या प्रकरणाच्या स्वतंत्र तपासाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी एन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली.
 
शेवटी एप्रिल महिन्यात सीबीआयने हे प्रकरण आपल्या हाती घेतलं. त्यानंतर दीपक कोचर, व्हिडिओकॉन ग्रुप आणि इतर अज्ञात लोकांमधील व्यवहाराचा तपास सुरू झाला. चंदा कोचर यांनी जूनमध्ये सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला.
 
कोचर यांच्यानंतर संदीप बक्षी हे बँकेचे सीइओ बनले. पुढे चंदा कोचर यांनी राजीनामा दिल्यानंतर संदीप बक्षी यांची बँकेचे पूर्णवेळ सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 Published By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments