rashifal-2026

10 रुपयांसाठी मुलाची हत्या, स्विमिंग पुलचे भाडे दिले नाही म्हणून नाकात आणि तोंडात भरली माती

Webdunia
शुक्रवार, 28 जून 2024 (12:02 IST)
Moradabad News: उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद मध्ये भयंकर घटना समोर आली आहे. इथे स्विमिंग पूल मध्ये अंघोळीसाठी गेलेल्या मुलाने 10 रुपये भाड दिले नाही म्हणून त्याची हत्या करण्यात आली आहे.
 
10 रुपये दिले नाही म्हणून स्विमिंग पूल मालकाने वडील आणि मुलगा दोघांची हत्या केली आहे. यानंतर त्यांच्या नाकात आणि तोंडात माती आणि रेती भरण्यात आली. हत्येनंतर त्यांना उसाच्या शेतामध्ये फेकण्यात आले. पोलिसांनी केस नोंदवत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
 
या आरोपींनी बेकायदेशीर पणे शेतामध्ये स्विमिंग पूल बनवला आहे. यामध्ये प्रवेशासाठी 10 रुपये घेतले जातात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत 11 वर्षांचा लहान मुलगा नेहमी स्विमिंग पूल मध्ये जायचा आणि पैसे न देता पळून जायचा. पोलिसांनी सांगितले की हा मुलगा स्विमिंग पूलसाठी घरातून निघाला तर परत आलाच नाही. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर मृतदेह उसाच्या शेतामध्ये आढळला. पोलिसांना घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले ज्यामध्ये सिद्ध झाले की, या मुलाची गाला आवळून हत्या करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments