Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजरातमध्ये दर्गा हटवण्यावरून झटापट, एकाचा मृत्यू, पाच पोलीस जखमी

Webdunia
रविवार, 18 जून 2023 (11:25 IST)
गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात एक दर्गा हटवण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद होऊन झटापट झाली. या गोंधळात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले.
 
शुक्रवारी (16 जून) रात्री उशिरा येथील माझेवाडी दरवाजा परिसरात हा प्रकार घटला.
 
जुनागढचे पोलीस अधीक्षक रवि तेजा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की एका व्यक्तीचा मृत्यू हा दगडाचा मार बसून झाला आहे. तर पाच पोलीस कर्मचारीही जखमी झाले.
 
शनिवारी सकाळपर्यंत पोलिसांनी 174 जणांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
 
बीबीसी गुजरातीचे स्थानिक सहयोगी पत्रकार हनिफ खोखर यांच्या माहितीनुसार, माझेवाडी दरवाजाजवळचा दर्गा पाच दिवसांत हटवण्यात यावा अशी नोटीस येथील प्रशासनाने दिली होती.
या नोटिशीनंतर लोक दर्ग्याजवळ जमले आणि प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करू लागले.
 
तर पोलिसांच्या मते, यानंतर जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यामुळेच पोलिसांना लाठीमार करावा लागला. यादरम्यान पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्याही फोडल्या.
 
प्राथमिक माहितीनुसार, दर्ग्याजवळ जमलेल्या जमावाने गुजरात परिवहन विभागाच्या बसला आग लावण्याचा प्रयत्न केला. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत.
पोलिस आणि जमावाच्या झटापटीचाही एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
 
या घटनेत बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनाही दुखापत झाल्याचं समोर येत आहे.
 
एसपी रवि तेजा यांच्या माहितीनुसार, जमावातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्रभर शोधमोहीम राबवली. यादरम्यान सुमारे 174 जणांची चौकशी करण्यात आली.
 
काय आहे प्रकरण?
जुनागढच्या माझेवाडी दरजावाजवळ एका रस्त्याच्या कोपऱ्यावर हा दर्गा आहे. दर्गा हटवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने नोटीस पाठवली होती.
 
दर्ग्याचं बांधकाम अवैध असून ते पाच दिवसांत हटवावं असं प्रशासनाने म्हटलं होतं.
जुनागढमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यादरम्यान अवैध बांधकामे हटवण्याची कारवाईही केली जात आहे.
 
रवि तेजा यांच्या माहितीनुसार, महापालिका प्रशासन अवैध दर्गा हटवण्यासाठी जाताच लोकांचा जमाव एकत्रित आला. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळालं नाही.
 
यानंतर जमावामधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. यानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई सुरू केली. याच दरम्यान माझेवाडी पोलीस ठाण्यावरही काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे.
 
या प्रकरणाची पोलीस आता कसून चौकशी करत आहेत. संबंधित घटना पूर्वनियोजित होती का याचा शोध घेतला जात आहे. लोकांच्या कॉल रेकॉर्ड्सचीही माहिती मागवण्यात आली आहे. अजूनही या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती दिसून येते.
 
Published by- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

पुढील लेख
Show comments