rashifal-2026

पंजाबमध्ये ISIच्या 4 दहशतवाद्यांना अटक, CM अमरिंदर यांनी हाय अलर्टचे आदेश दिले

Webdunia
बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (21:01 IST)
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सुरक्षा लक्षात घेऊन राज्यात हाय अलर्टचे आदेश दिले आहेत. बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात आयईडी टिफिन बॉम्बने तेलाचा टँकर उडवण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्यूलच्या आणखी चार सदस्यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा आदेश जारी केला आहे.
 
 
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान पंजाबला अस्थिर करण्यात सतत गुंतलेला आहे. पाकिस्तान अनेकदा ISI च्या मदतीने सीमा ओलांडून शस्त्रे आणि हेरॉईनची खेप पाठवण्याच्या प्रक्रियेत आहे. यासाठी पाकिस्तान ड्रोनची मदत घेतो. भारताने अनेक वेळा पाकिस्तानी ड्रोनही पाडले आहेत. या दहशतवाद्यांना अटक करण्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात अमृतसरमधील एका गावाजवळून टिफिन बॉम्बसह हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments