Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा सीटवरून गोंधळ, भिडल्या महिला

Webdunia
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (17:17 IST)
social media
सध्या सीटवरून खूपच गोंधळ सुरु आहे.बस,मेट्रो, ट्रेन,विमानात आपण सीटवरून होणाऱ्या गोंधळ आणि हाणामारी बद्दल ऐकतच आहोत. आता दिल्ली मेट्रो मध्ये देखील पुन्हा एकदा सीटवरून दोन महिला भिडल्या आहेत. मेट्रो मध्ये घडणाऱ्या घटनांचे व्हिडिओ अनेकदा समोर येतात. मेट्रोचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली आणि नंतर महिलांनी एकमेकींवर आरडाओरड करून शिवीगाळ करण्यास सुरु केले.या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
<

दिल्ली मेट्रो में एक महिला का दुर्व्यवहार का वीडियो हुआ वायरल pic.twitter.com/Jae39k8iHE

— Priya singh (@priyarajputlive) August 3, 2023 >
 व्हायरल होत असलेल्या मेट्रोच्या महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ प्रिया सिंग या युजर ट्विटरवर शेअर केला आहे.  व्हिडिओमध्ये एक महिला मेट्रोच्या आत सीटवर बसलेली दिसत आहे. इतक्यात दुसरी महिला तिथे पोहोचते आणि सीटवर पुढे जाण्याचा इशारा करते. दरम्यान, सीटवर आधीच बसलेली महिला जोरात वाद घालू लागली आणि सीटवर बसलेल्या महिलेला शिवीगाळ करू लागली 
 
यादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या महिलेचे बोलणे ऐकून इतर महिलेलाही राग येतो. ती म्हणते मी बुटाने मारेन. प्रत्युत्तरात महिला म्हणाली, 'बुटाने मारू नका, बेल्टने मारा, गोळी मारा. बुटांचे युग गेले, आता बुलेटचे युग आहे, कोणत्या युगात जगत आहात. 
 
मेट्रोमध्ये दोन महिलांमध्ये सुरू असलेला हा वाद पाहून एक पुरुष मदतीला येताना दिसतो, पण एक महिला त्याला दूर करते दुसऱ्या महिलेनेही शिवीगाळ करणाऱ्या महिलेला मोठ्या आवाजात समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती महिला शांत झाली नाही. एका प्रवाशाने मेट्रोमधील या संपूर्ण वादाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments