Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या, आरोपी ताब्यात

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2024 (16:20 IST)
कर्नाटकच्या हुबळी येथे हुबळी- धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलीची हत्या करण्यात आली  मुलीच्या कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. नेहा हिरेमठ असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी नेहाच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. फैयाज असे त्याचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात फयाज तरुणीवर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. हत्येनंतर तो फरार झाला होता. मात्र नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेहा स्थानिक नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती. 

आरोपी बेळगाव जिह्यातला होता. तो बीसीएच्या प्रथम वर्षी परीक्षेत नापास झाला. तो गेल्या सहा महिन्यांपासून महाविद्यालयत येत नव्हता. गुरुवारी 18 एप्रिल रोजी तो धारधार शस्त्र घेऊन आला आणि आरोपीने नेहाचा पाठलाग करून तिची हत्या केली. नंतर त्याने घटनास्थळ वरून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षदर्शींनी त्याला ताब्यात घेतले. नेहाला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 
 
मयत नेहा हिरेमठ हुबळीच्या एका महाविद्यालयात एमसीएच्या प्रथम वर्षात होती. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केली. नेहाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फैयाजला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पुढील तपास सुरु आहे. 
 
Edited By- Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

पुढील लेख
Show comments