Dharma Sangrah

आरएसएस कार्यकर्त्यावर केरळमध्ये हल्ला

Webdunia
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. रविवारी कुन्नूर येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या आरएसएस कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, CPI (M) च्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. आरएसएस कार्यकर्ता निधेश (28 वर्ष) याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचाराकरीता कोझीकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधेश याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, सत्ताधारी CPI (M)च्या कार्यकर्त्यांनी निधेशवर हल्ला केला आहे.  मुज्जफिललंगड समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी 5.30 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर परिसरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. कन्नूर परिसरात नेहमीच CPI (M) आणि भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असतात.
 
केरळमध्ये भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद-विवाद होत असतात. याविरोधात भाजपने जन रक्षा यात्राही काढली आहे. या यात्रेत भाजप अध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ, स्मृती ईरानी यांच्यासारखे दिग्गज नेते सहभागी झाले होते. भाजपच्या अनेक नेत्यांनी या हल्ल्यांनंतर राज्य सरकारवर थेट आरोप केले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments