Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गॅस रिफिलिंग दरम्यान सिलिंडरचा स्फोट, चार जागीच ठार

Webdunia
शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (23:32 IST)
राजस्थानमधील जोधपूर शहरात गॅस रिफिलिंग दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाला. या अपघातात तीन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला. सर्व एकाच कुटुंबातील आहेत. तर 16 जण गंभीर जखमी आहेत. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या वसाहतीतील लोकही हादरले. 
 
सदर घटना तीन वाजण्याच्या सुमारास आहे. यानंतर कीर्ती नगर परिसरात गॅस गळती झाली. काही वेळातच स्फोट झाला. जवळच असलेल्या कॉलनीत उभी असलेली वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी आली. 
 
ज्या घरात रिफिलिंग होत होते ते घर कोजाराम लोहार यांचे असल्याचे तपासात उघड झाले. कोजाराम यांचा मुलगा गॅस रिफिलिंगचे काम करतो. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे सध्या समजू शकलेले नाही. रिफिलिंग दरम्यान हा स्फोट झाल्याचा संशय आहे. 
 
तपासात घरातून सुमारे चार डझन घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरही काढण्यात आले आहेत. हे घर लोकांच्या घरी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या फेरीवाल्याचं असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात घराचा काही भागही कोसळला.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. जखमींवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments