Marathi Biodata Maker

‘डीडी’ चा लोगो नव्या रूपात येणार

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (11:11 IST)

सरकारी वृत्तवाहिनी ‘दूरदर्शन’ अर्थात ‘डीडी’ आपला लोगो नव्या रूपात सादर करणार आहे. यासाठी सर्व भारतीयांना संधी देण्याची योजना डीडीने आखली आहे. सध्याचा दूरदर्शनचा लोगो हा ५८ वर्षे जुना लोगो आहे. त्यामुळे आता नव्या लोगोसाठी स्पर्धा घेण्याचे डीडीने जाहीर केले आहे. यासाठी तब्बल १ लाख रूपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.  त्यासाठी डीडी सर्व भारतीयांना या स्पर्धेसाठी आंमत्रित करीत आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला १३ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यासाठी एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच ही स्पर्धा जिंकल्यानंतर संबंधीत व्यक्ती किंवा संस्थेला आपल्या लोगोच्या डिझाइनवर कॉपीराईटचा अधिकार ठेवता येणार नाही. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दूरदर्शनच्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments