Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डीआरआय पथकाने गुवाहाटी आणि दिमापूर येथे भारत-म्यानमार सीमेवरून तस्करी केलेले 8.38 कोटी रुपयांचे 15.93 किलो विदेशी सोने जप्त केले

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2022 (18:15 IST)
गुवाहाटी आणि दिमापूर येथे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी एकूण 15.93 किलो सोने जप्त केले आहे. त्याची किंमत 8.38 कोटी एवढी आहे. म्यानमारच्या सीमेवरून सोन्याची ही खेप भारतात तस्करी करण्यात आली होती, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी दिली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या बिस्किटांवर विदेशी मुद्रांक आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकार्‍यांनी मणिपूरमधील माओहून आसाममधील गुवाहाटीकडे येणार्‍या दोन तेल टँकर आणि एका ट्रकवर नजर ठेवली. दिमापूर ते गुवाहाटी दरम्यान ही वाहने एकाच वेळी अडवून त्यांची झडती घेतली असता वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून 15.93 किलो वजनाची एकूण 96 सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आणि वाहनांच्या वेगवेगळ्या भागात लपवून ठेवलेली सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. 

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या तस्कर टोळीतील पाच जणांना अटक केली असून तिन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात, DRI ने देशभरातील विविध ऑपरेशन्समध्ये एकूण 833 किलो सोने जप्त केले ज्याचे मूल्य 405 कोटी रुपये आहे. यापैकी 102.6 कोटी रुपयांचे 208 किलोहून अधिक सोने ईशान्येकडील राज्यांमधून जप्त करण्यात आले आहे. ज्याची तस्करी भारत-म्यानमार आणि भारत-बांगलादेश सीमेवरून केली जात होती.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments