Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुबई पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज

Dubai
Webdunia
मंगळवार, 23 जून 2020 (09:05 IST)
परदेशी पर्यटक येत्या ७ जुलैपासून दुबईला जाऊ शकतील. दुबईने याला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर रेसिडेन्सी व्हिसा असणारे परदेशी नागरिक २२ जूनपासून दुबईला परत येऊ शकतील. प्रवाशांसाठी सरकारने एक प्रोटोकॉल यादीही जाहीर केली आहे, जी सर्वांसाठी अनिवार्य असेल.
 
दुबई माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकारने या महामारीला ध्यानात ठेवून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, पर्यटकांना त्यांचे कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर करावे लागेल किंवा दुबई विमानतळावर चाचणी करून घ्यावी लागेल. ज्यांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना १४ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल. दुबईच्या यात्रेदरम्यान ९६ तास आधी कोरोना विषाणूची तपासणी करणे देखील बंधनकारक केले आहे. दुबई प्रशासनाने असे म्हटले आहे की, पर्यटकांकडे आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा असला पाहिजे तसेच, त्यांनी सर्व माहिती असलेले मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही डाऊनलोड केले पाहिजे. याव्यतिरिक्त, त्यांना आरोग्याशी संबंधित फॉर्म देखील भरावा लागेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments