Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीला बाईकला बांधून फरफटत ओढले,आरोपी पतीला ताब्यात घेतले

Webdunia
रविवार, 15 जानेवारी 2023 (16:09 IST)
नवरा बायकोचं नातं हे जन्म जन्मांतराचं असत असं म्हणतात.पिलीभीतच्या पुरनपूर परिसरातून नात्याला काळिमा फासणारी घटना शनिवारी घुंगचाई गावात घडली. बायकोने नवऱ्याला दारू पिण्यास विरोध केला असता पतीने घुंगचाई गावातील गर्भवती सुमनचे दोन्ही हात बांधून तिला 100 मीटर अंतरावर दुचाकीवरून ओढले. आवाज ऐकून लोक जमा झाले. मात्र तिला वाचवण्याचे धाडस कोणीच करू शकले नाही. भावाने खूप प्रयत्ननाने बहीण सुमनला वाचवले, आणि माहेरी आणले. तक्रारीवरून पोलिसांनी सुनीताचे मेडिकल केले तसेच आरोपी पतीला ताब्यात घेतले. दोघांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
 
 घुंघचाई गावातील रहिवासी सुमन आणि रामगोपाल यांच्यात चार वर्षांपूर्वी प्रेमसंबंध सुरू झाले होते. सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला. सुमनच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. या दोघांनी तीन वर्षांपूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केला. काही दिवस सर्व काही सुरळीत चालले. 
 
लग्नानंतर काही दिवसांतच पतीला दारूचे व्यसन लागले. विरोध केल्यावर दोघांमध्ये अनेकदा वादावादी ही झाली. सुमन आठ महिन्यांची गरोदर आहे. तिने  सांगितले की, शनिवारी दुपारी रामगोपाल दारू पिऊन घरी पोहोचला. तिने आक्षेप घेतला. यावर पतीने सुमनला घरात बेदम मारहाण केली. नंतर त्याचे दोन्ही हात पाठीमागे बांधून दुचाकीला दोरी बांधून गावात फरफटत नेले. 
 
घटनेच्या वेळी घरात उपस्थित रामगोपालचा भाऊ आणि आई यांनी विरोध करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. राम गोपाल त्याच्याशीही भांडू लागला. पत्नीला दुचाकीला बांधून ओढत नेत असल्याचे पाहून बघ्यांची गर्दी झाली. पण कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. रामगोपालने सुमनला त्याच्या बाईकवर सुमारे 100 मीटर दूर तिच्या माहेरी फरफटत नेले.  सुमनचा भाऊ वैशपाल याने तिला खूप प्रयत्नानंतर वाचवले.
 
पोलिसांनी माहिती मिळताच रामगोपालला ताब्यात घेतले. पोलिसांनी सुमनचे मेडिकल केले आहे.  सुमनच्या पती राम गोपालला अटक करण्यात आली आहे. विवाहितेचा भाऊ वैशपाल याच्या फिर्यादीवरून सुमनला जिवे मारण्याच्या उद्देशाने ओढत नेऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

पुढील लेख
Show comments