rashifal-2026

फारुख अब्दुल्ला श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2017 (17:25 IST)

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. अब्दुल्ला यांनी पीडीपीचे नाझीर अहमद खान यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीत मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला तसेच मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. फक्त सात टक्के मतदानाची नोंद झाली.  गुरुवारी 38 मतदान केंद्रांवर पुन्हा फेरमतदान झाले. त्यावेळी फक्त दोन टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात प्रथमच इतक्या कमी मतदानाची नोंद झाली. एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. पण फारुख अब्दुल्ला आणि पीडीपी उमेदवार नाझीर अहमद खान यांच्यात थेट लढत होती. 2014 लोकसभा निवडणुकीत फारुख अब्दुल्ला पीडीपीच्या तारीक हमीद कारा यांच्याकडून पराभूत झाले होते.  

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments