Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

NEET परीक्षेत कमी गुण, सरकारी महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे वडील-मुलाची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (15:32 IST)
- मुरलीधरन काशीविश्वनाथन
तामिळनाडूमध्ये NEET परीक्षा दिल्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मोठी आहे. मात्र अशाप्रकारे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
 
चेन्नईच्या क्रोमपेट येथील कुरिंजीनगर भागातील छायाचित्रकार सेल्वाशेखरचे मित्र स्तब्ध आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू अजूनही आहेत.
 
शनिवारी (12 ऑगस्ट) आपल्या मित्राच्या मुलाने आत्महत्या केल्याने उद्धवस्त झालेल्या सेल्वाशेखरचे सांत्वन करण्यासाठी आलेल्यांना आता कोणाचे सांत्वन करावे हेच उरले नाही.
 
कारण हे सर्व कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. पत्नीपासून विभक्त झालेले सेल्वाशेखर त्यांच्या मुलाबरोबर राहात होते. त्यांचा मुलगा जगदीश्‍वरन याने पल्लवरम इथून बारावी पूर्ण केली.
 
त्याला बारावीत 424 गुण मिळाले होते.
 
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याने गेल्या दोन वर्षांपासून NEETची तयारी केली परंतु सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याला पुरेसे गुण मिळू शकले नाहीत. यामुळे वडील आणि मुलाला खूप दुःख झाले असले तरी, त्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी आणि NEET कोचिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी पैसे दिले होते.
 
याच परिस्थितीत दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट रोजी घरी कोणी नसताना जगदिश्वरन याने आत्महत्या केली. वडील सेल्वाशेखर यांना हा मोठा धक्का होता.
 
रविवारी (13 ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी NEET ची परीक्षा रद्द केली पाहिजे असे नमूद केले.
 
"NEET रद्द केली तरच सर्वांचे भले होईल. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की ते NEET रद्द करणार आहेत. त्यांनी ते करावे. मी माझ्या मुलाला एकट्याने वाढवले. माझी परिस्थिती कोणावरही होऊ नये," असे ते म्हणाले.
 
त्यांच्या मित्रांनी त्यांचे सांत्वन केले आणि निघून गेले. त्यांचे चुलतेही उपस्थित होते.
 
या स्थितीत सोमवारी (14 ऑगस्ट) सकाळी सेल्वाशेखर यांनीही घरातील रिकाम्या खोलीत आत्महत्या केली. सेल्वाशेखर यांच्या मित्रांना वाटते की आता आपल्याबरोबर कोणीही नाही, या एकाकीपणाच्या भावनेने त्यांना या निर्णयाकडे ढकलले असावे.
 
जगदीश्‍वरन आणि त्याच्या अनेक मित्रांचे मेडिकलचे शिक्षण घेण्याचे स्वप्न होतं.
 
या सर्वांनी 12वी पूर्ण केल्यानंतर खाजगी NEET कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. जगदीश्‍वरनने गेल्या दोन वर्षांत NEET परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याला पुरेसे गुण मिळाले नाहीत.
 
जगदीश्‍वरनला माहीत होते की, त्याचे वडील त्याला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून शिक्षणासाठी परदेशात पाठवू शकत नाहीत.
 
त्यामुळे जगदीश्वरनने पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा कोचिंग सेंटरसाठी पैसे दिले. दरम्यान, त्यांच्यासोबत शिकलेल्या आणि सरकारी महाविद्यालयात जागा न मिळालेल्या एका व्यक्तीने खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणखी दोन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न सोडून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. यामुळे जगदीश्‍वरनला नैराश्य आले असावे, असे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे.
 
त्यांचा मित्र संतोष सांगतो की जगदीश्वरनची इच्छा डॉक्टर म्हणून इतरांची सेवा करण्याची होती आणि त्याने अपयशी ठरलेल्या इतरांचे सांत्वन केले होते.
 
"तो अयशस्वी झालेल्या प्रत्येकाचे सांत्वन करत होता. दुसरा कोणताही निर्णय घेऊ नका, पुन्हा प्रयत्न करूया," असं तो सांगायचा असं संतोषने सांगितलं.
 
जगदीश्वरन हा चांगला विद्यार्थी असला तरी त्याला सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुरेसे गुण मिळाले नाहीत, असे त्याचा मित्र आदित्य सांगतो.
 
डॉक्टर बनणे, हे जगदीश्वरनचे स्वप्न होते, असे त्याच्या घराजवळ राहाणाऱ्या शिक्षिका वरमाठी सांगतात.
 
"त्याच्या वडिलांनी किंवा इतर कोणीही जगदीश्वरनवर वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी दबाव आणला नाही. त्याने हा निर्णय का घेतला हे मला माहीत नाही," वरमाठी सांगतात.
 
अनेकांचे जीव वाचवण्याचे वैद्यकीय स्वप्न दोन जीव गमावल्याने संपुष्टात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments