Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमानात प्रवशांमध्ये फ्री स्टाइल फाइट Video

Webdunia
गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (15:30 IST)
Fight On Thai Smile Airline Flight: बस आणि ट्रेनमध्ये सीटवरून प्रवाशांमध्ये अनेकदा भांडणे होतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यामध्ये क्षुल्लक गोष्टीसाठी लोक मारायला तयार असतात, मात्र आता जमिनीपासून हजारो फूट उंचीवरही हे मारामारी पाहायला मिळत आहे. नुकताच सोशल मीडियावर अशाच एका मारामारीचा व्हिडीओ सर्वांचेच होश उडवत आहे. असे सांगण्यात येत आहे की, थाई स्माइल एअरवेजच्या बँकॉकहून कोलकाता, भारताच्या विमानात विमान आकाशात हजारो फूट उंच उडत असताना ही हाणामारी झाली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना मंगळवार (27 डिसेंबर) ची आहे. वास्तविक, बँकॉकहून येणाऱ्या फ्लाइटमधील प्रवाशांमध्ये केवळ भांडणच झाले नाही, तर जोरदार हाणमारी झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. पहिल्या दोन प्रवाशांमध्ये वाद कसा सुरू झाला हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. दरम्यान, वाढत्या वादाचे रुपांतर हाणामारीत कधी झाले ते कळलेच नाही. दरम्यान, एअर होस्टेसने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात करतो. दरम्यान आणखी अनेक तरुण भांडणात उडी घेतात आणि समोरच्या व्यक्तीला मारहाण करू लागतात. वाढता वाद पाहून फ्लाइट अटेंडंट दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. फ्लाइटमध्ये बसलेले सहप्रवासी आणि केबिन क्रू मेंबर्सनी ही संपूर्ण घटना स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली आणि असे न करण्याची आणि शांतपणे आपल्या सीटवर बसण्याची घोषणाही करण्यात आली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments