Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिहारमध्ये भीषण पूर, २५३ जणांचा बळी

Webdunia
मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये भीषण अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे आतापर्यंत २५३ जणांचा बळी गेला आहे. बिहारमधील तब्बल सव्वाकोटी लोकसंख्या एकटवलेल्या २० जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.  अररिया जिल्ह्यात सर्वाधिक भीषण पूर परिस्थिती आहे.
 
बिहारच्या सीमावर्ती भागात आणि नेपाळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे किनारी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून बचावकार्य जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पूराचा वेढा पडलेल्या गावांमधून तब्बल ४.६४ लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. तसेच या पूरग्रस्तांच्या सोयीसाठी १,२८९ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल ३.९२ कोटी लोकांनी आसरा घेतला आहे.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

पुढील लेख
Show comments