rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरक्कोनममध्ये मंदिराच्या कार्यक्रमादरम्यान क्रेनचा भाग कोसळून चार ठार, नऊ जखमी

Keelavithi in Arkonam
, सोमवार, 23 जानेवारी 2023 (10:39 IST)
तामिळनाडूच्या अरकोनममधील कीलाविथी येथून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. येथील तामिळनाडूच्या राणीपेट जिल्ह्यात नेमिलीच्या किलिवेडी गावात मांदियामम्न मंदिरात मैलार उत्सवादरम्यान क्रेनचा काही कोसळल्याचे  वृत्त आहे.या वेळी शेकडो भाविक तिथे उपस्थित होते.या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.तर नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनेचे व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मंदिराजवळ क्रेनच्या मदतीने मोठा हार आणला जात होता. क्रेनवर काही तरुण देखील उभे होते. अचानक करेन डाव्याबाजूने सरकून तोल जाऊन खाली कोसळली. या अपघातात चार जण ठार झाले असून 9 जण जखमी झाले हे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातआले आहे. क्रेन  वापरण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या क्रेन चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hockey World Cup : हॉकी विश्वचषकात यजमान भारत हॉकी विश्वचषकातून बाहेर