Publish Date: Mon, 19 Apr 2021 (19:35 IST)
Updated Date: Mon, 19 Apr 2021 (19:36 IST)
18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाची तिसरी मोहीम देशात सुरू होणार आहे. यामध्ये 18 वर्षांपुढील सर्व जणांना लस देण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दर दिवसाला देशात लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.