Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गांधी कुटुंबीयांसाठी गोवा हे सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण-अमित शहा

Webdunia
सोमवार, 31 जानेवारी 2022 (09:58 IST)
"भाजपाने गोव्याचा विकास केला. गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे," अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात बोलताना केली. गोवा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी शहा खुद्द गोव्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
ते पुढे म्हणाले, "भाजपासाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा. पण काँग्रेससाठी गोवा म्हणजे गांधी परिवाराचा गोवा. आम्ही राज्याचं बजेट 432 कोटींहून 2,567 कोटींवर आणलं आहे."

"माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या विकासासाठी काहीही केलं नाही. भाजपाने मात्र दिलेला शब्द पाळला. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचं कौतुकही केलं. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सावंतजी, मनोहर पर्रिकरांच्या गोल्डन गोव्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत", असं शहा म्हणाले.

"गोव्यातला लसीकरणाचा वेग देशात सर्वाधिक आहे. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेगाने 100 टक्के लसीकरणाचं लक्ष गाठण्यात गोवा यशस्वी ठरला आहे", असं शहा म्हणाले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

महाराष्ट्रच्या राजनीतीमध्ये राज ठाकरेंच्या मुलाची एंट्री, जात-पातीला घेऊन MNS प्रमुख काय म्हणाले?

महाराष्ट्रात बुलढाणा मध्ये मिळली 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती

पुढील लेख
Show comments