सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये एक चोरी दिसत आहे. ट्रकच्या आतमधून एक व्यक्ती रस्त्य्यावर बकऱ्या फेकत आहेत. सात-आठ बकऱ्या फेकल्यानंतर ती व्यक्ती ट्रकला लोंबकळते आणि नंतर बाजूनेच जाणाऱ्या कारच्या टपावर उतरते.
नियोजित कटानुसार काही बकऱ्या रस्त्यावर टाकायच्या आणि थोड्यावेळानंतर सोबतच्या कारवर त्याने उतरायचे असं ते दृश्य दिसतं.
या बकऱ्या चोरीच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रच नाहीतर राज्याबाहेरही गोंधळ उडाला आहे. कारण या व्हीडिओत उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करण्यात आलं होतं.
तेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले की हा व्हीडिओ उत्तर प्रदेशातील नाही तर महाराष्ट्रातील आहे.
महामार्गावरील पाट्यांमुळे हा प्रकार नेमका कुठे घडला हे देखील समजले आहे. पण अद्याप आरोपी कोण आहेत हे समजले नाही. या गुन्ह्यात अजून कुणालाही अटक झालेली नाही.
नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरीमधील खंबाळे या गावाजवळ हा प्रकार घडला आहे.
हा व्हीडिओ उत्तर प्रदेशचा असल्याच्या चर्चेला उत्तर प्रदेश पोलिसांनाची ट्वीट करून पूर्णविराम दिला आहे. नाशिक पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
जिवंत बकऱ्यांची किंमत साधारणतः 15,000 रुपये इतकी असते.
इगतपुरीमधल्या घोटी पोलीस ठाण्यात पोलिसांनी स्वतःच याबद्दलचा गुन्हा दाखल केला.
प्राण्यांना क्रुरतेनं वागवल्याबद्दल अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल झालाय.
हा प्रकार 1 मेपूर्वी घडल्याचं घोटी पोलिसांनी म्हटलंय.
घोटी पोलीस आरोपींच्या शोधासाठी तपास करत आहेत.