Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिअर बारला महापुरुष व गडकिल्ले देण्यास प्रतिबंध

Webdunia
मंगळवार, 6 मार्च 2018 (10:32 IST)
राज्यातील बिअर बार आणि दारूविक्री केंद्राना महापुरुष, देव-देवता, गडकिल्ले व महिलांची नावे देण्यास प्रतिबंध करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असून, यातून फक्त महापुरुष व गडकिल्ले यांची नावे या बिअरबार व दारू दुकानांना देण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.


हा प्रतिबंध देव देवता व महिलांच्या नावासाठी  नसल्याचे विधान परिषदेत दिलेल्या तारांकित प्रश्‍नाच्या उत्तरामुळे समोर आले आहे. राज्यातील बिअरबार, दारू दुकाने आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच, गडकिल्ल्यांची नावे दिली जातात. हा महापुरुषांचा अवमान असून, राज्याच्या संस्कृतीला शोभणारे हे चित्र नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी गेल्यावर्षी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे देशी दारू, बिअरबारला महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती. आमदार पंडित यांच्या सूचनेनंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी राज्यातील बिअरबार आणि दारू  दुकांनाना महापुरुष व गडकिल्ले यांची नावे देण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिसूचनेचे प्रारुप व विधी व न्यायविभागाच्या अभिप्राय व सहमतीसाठी सादर केलेले आहे.

देव-देवता यांची नावे बिअरबार व दारूविक्री केंद्रांना देण्यास प्रतिबंध कसा करता येईल याबाबत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मागविण्यात आले असून, त्यामुळे यावर अजून निर्णय झालेला नाही असे उत्तर दिले आहे. या उत्तरामुळे देव-देवता व महिलांच्या नावाचा वापर दारू दुकान व बिअरबारला करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

पुढील लेख
Show comments