Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकरच शंभर रुपयांचं नाणं येणार

Webdunia
बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (10:52 IST)

सरकार लवकरच शंभर रुपयांचं नाणं जारी करणार आहे. सोबतच पाच रुपयांचं नवं नाणंही जारी करण्यात येणार आहे. डॉ. एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही नाणी जारी करण्यात येतील.

शंभर रुपयांचं नाणं 44 मिमी आणि 35 ग्रॅम वजनाचं असेल. नाण्याच्या वरच्या बाजूला अशोत स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल.  त्याखाली अंकामध्ये 100 लिहिलेलं असेल. नाण्याच्या मागील बाजूवर एम. जी. रामचंद्रन यांचा फोटो असेल. फोटोच्या खाली 1917 ते 2017 असं लिहिलेलं असेल. चार धातूंनी मिळून शंभर रुपयांचं हे नाणं तयार करण्यात येणार आहे.

 

पाच रुपयांचं नवं नाणं 23 मिमी आणि 6 ग्रॅम वजनाचं असेल. नाण्याच्या वरच्या बाजूला अशोत स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल.  त्याखाली अंकामध्ये 5 लिहिलेलं असेल. नाण्याच्या मागील बाजूवर एम. जी. रामचंद्रन यांचा फोटो असेल. फोटोच्या खाली 1917 ते 2017 असं लिहिलेलं असेल. तीन धातूंनी मिळून शंभर रुपयांचं हे नाणं तयार करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

पुढील लेख
Show comments