Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाच्या 5 दिवसानंतर वधूचा कोरोनामुळे मृत्यू झाला

Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (13:04 IST)
केंद्रपाडा- ओडिशाच्या केन्द्रापाडा जिल्ह्यात कोविड -19 मुळे एका 26 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, ज्याचे 5 दिवसांपूर्वी लग्न झाले होते. यानंतर अधिकारी विवाह समारंभात उपस्थित लोकांची चाचणी करत आहे, कारण अनेकांना संसर्ग पसरण्याची भीती वाढली आहे.
 
दुर्गादेवीपाडा गावात राहणार्‍यांना संजय कुमार नायक यांचे लग्न 10 मे रोजी झाले. नायक आपल्या लग्नासाठी बेंगळुरूहून आले आणि त्यांना तापसारखे लक्षणं होते आणि 13 मे रोजी चाचणीत कोविड-19 संसर्ग झाल्याचे आढळले. रजकनिकाच्या सामुदायिक आरोग्य केंद्र (सीएचसी) च्या चिकित्सा अधिकारी बिबेक राउत यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना घरी क्वारंटाइन केलं गेलं परंतु प्रकृती बिघडल्यानंतर भुवनेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे 15 मे रोजी संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला.
 
रविवारी वैद्यकीय पथकाने दुर्गादेवीपाडा गावात पोहोचून वधूसह कुटुंबातील इतर सदस्यांचे नमुने घेतले. किती लोक लग्नात सामील झाले आणि त्यांच्या संपर्कात कोण आले याची माहिती शोधण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख