Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आचारसंहिता उल्लंघनांबाबत आयोगाने मागविला अहवाल

Webdunia
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (08:22 IST)

निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रचारादरम्यान झालेल्या आचारसंहिता उल्लंघनांबाबतचा अहवाल मागवला आहे.याबाबत  निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आयोगाने म्हटले की, बुधवारी रात्री काँग्रेसचे एक शिष्टमंडळ आपल्या आरोपांसह निवडणूक आयोगाकडे आले होते. त्यानंतर आयोगाने यावर कारवाई करीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी दुपारपर्यंत या प्रकरणाचा अहवाल सोपवण्यास सांगितले होते. या प्रकरणी आलेल्या तक्रारींवर अजूनही चौकशी सुरु असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर एका मुलाखतीमुळे आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, राहुल गांधींविरोधात याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही. त्यांना केवळ एक नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर उत्तर देण्यासाठी त्यांना पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख
Show comments