Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेट्रोल टाकून बाईकच्या शोरूमला पेटवून पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली

Webdunia
बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (17:18 IST)
कर्नाटकातील कलबुर्गी येथे हुमनाबाद रोडवर असलेल्या दुचाकी शोरूमला भीषण आग लागली. या आगीत दुचाकी शो रूम चे मोठे नुकसान झाले आहे. या मध्ये उभ्या असलेल्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहे. काल सकाळी ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत होते मात्र खरे कारण काही औरच समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने तीन दिवसांपूर्वी ओला इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली होती. बाईक मध्ये काही त्रुटी असल्याचे ग्राहकाने सांगितले मात्र त्याला शो रूम मधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हा ग्राहक दररोज आपली बाईक घेऊन शो रूम मध्ये जायचा. मंगळवारी देखील हा बाईक घेऊन गेला असता. शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. मात्र सत्य काही औरच होते. 

या ग्राहकाने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शोरूमला आग लावण्याचे कबूल  केले आहे. त्याला शोरूम मधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संतापून त्याने काल सकाळी पेट्रोल शिंपडून शोरूमला आग लावली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments