चार वेळा आमदार आणि माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सखू यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिमला येथील रिज मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.
सिमला येथील रिज मैदानावर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सुखविंदर सिंग सुखू यांना राज्याचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.शपथविधीवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही रिज मैदानावर उपस्थित होत्या.
सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. शिमला येथील रिज मैदानावर राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते.
शपथ घेण्यापूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.प्रतिभा सिंह यांची भेट घेतल्यानंतर सखू म्हणाले की, प्रतिभा सिंह या राज्यातील पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण काम करतात. त्यामुळेच त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.