Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो

४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो
, सोमवार, 3 डिसेंबर 2018 (16:07 IST)
भारतीय नौदल : Indian Navy 
 
स्थापना १९३४
देश भारत ध्वज भारत
विभाग नौदल
आकार ५६००० खलाशी
मुख्यालय नवी दिल्ली
 
भारतीय नौदल इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
 
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
 
1953 मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. 1967 मध्ये पाणबुड्या ताफ्यात समाविष्ट झाल्या.
 
युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने माझगाव गोदी मध्ये 1966 वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत 80 युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिओ ऑफर, जुन्या फोनवर देखील मिळेल 2,200 रुपये कॅशबॅक