सिक्कीम देशातील शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणारं पहिले राज्य बनले आहे. 50 पेक्षा जास्त वय असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. निवृत्ती वेतन म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना दर महिन्याला एक हजार रूपये मिळणार आहेत. या योजनेची घोषणा खरंतर ऑगस्टमध्येच करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास नोव्हेंबर 2018 पासून सुरूवात झाली आहे.
गेल्या महिन्यात सिक्कीमच्या समरसा भागामध्ये सैंद्रीय पद्धतीने शेती करणाऱ्यांचा आणि राज्यातील ग्रामपंचायतींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी 78 शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन त्यांच्या हाती सुपूर्द केलं. या योजनेचा फायदा 1 हजार शेतकऱ्यांना होणार असून ही संख्या येणाऱ्या काळात आणखी वाढेल असं सिक्कीम सरकारने सांगितले आहे.