Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

तेज प्रताप यादवने घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेतला

national news
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव याने गुरुवारी घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. पत्नी ऐश्वर्या राय पासून घटस्फोट मिळावा म्हणून 2 नोव्हेंबर रोजी तेज प्रताप यादवने पाटण्याच्या कौटुंबीक न्यायालयात अर्ज केला होता. तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न 12 मे 2018 रोजी झाले होते. 
 
लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच तेज प्रताप आणि ऐश्वर्या राय यांच्यातील वाद घटस्फोटापर्यंत पोहोचल्याने मोठा चर्चेचा विषय बनला आहे. लग्नासाठी कुटुंबीय आणि पक्ष जबाबदार असल्याचे सांगत कुटुंबीयांनी ऐश्वर्यासोबत जबरदस्तीने लग्न लावल्याचे तेजप्रताप याने प्रसारमाध्यमांना सांगितले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदले : नितेश राणे