Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भीषण रस्ता अपघातात, कार जळून खाक; दुचाकीस्वार पिता पुत्राचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 11 जानेवारी 2022 (23:22 IST)
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील नौगाव पोलीस स्टेशन परिसरात आज संध्याकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात कारने दुचाकीला धडक दिली. खजुराहो-झाशी फोर लेनवर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पिता पुत्राचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार जळून खाक झाली. तर दुचाकीचाही स्फोट झाला.
 बाईकचे तुकडे झाले , मिळालेल्या माहितीनुसार चौका रहिवासी राघवेंद्र सिंह बुंदेला डल्निया गावातून परतत होते. त्यांच्यासोबत त्यांचा 12वर्षांचा मुलगा कल्लू सिंग बुंदेला हा दुचाकीवर होता. झाशी खजुराहो फोरलेनवर त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे झाले आणि कार जळून खाक झाली. 
 
 सूत्रांचे म्हणणे आहे की, अपघातानंतर कारमधील प्रवासी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. नौगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी दीपक यादव यांनी सांगितले की, ही घटना इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. स्टेशन प्रभारी म्हणाले की, सध्या या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments