Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना आणि राष्ट्रवादीला इलेक्टोरल बाँडमधून किती आणि कुणी पैसे दिलेत? संपूर्ण यादी –

Webdunia
शुक्रवार, 22 मार्च 2024 (16:04 IST)
शिवसेनेला इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून सर्वाधिक रक्कम (85 कोटी रुपये) बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्स टेक्नोलॉजी लिमिटेडकडून, तर राष्ट्रवादी काँग्रेसला क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सर्वाधिक (10 कोटी रुपये) रक्कम मिळाली आहे. इलेक्टोरल बाँडबाबत सर्व माहिती जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर, अखेर निवडणूक आयोगानं संकेतस्थळावर तशी माहिती प्रकाशित केलीय.

देशभरातल्या राजकीय पक्षांमध्ये इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा क्रमांक लागतो.
तसंच, फ्युचर गेमिंगच्या देणगीमुळे द्रमुक पक्षही इलेक्टोरल बाँडमधून अधिक पैसे कमावणाऱ्यांच्या यादीत येऊन बसला आहे.आपण या बातमीतून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून 2019 ते 2024 या कालावधीत किती आणि कुणी पैसे दिले, हे जाणून घेणार आहोत. सुरुवातील शिवसेना-राष्ट्रवादीचे टॉप-10 देणगीदार जाणून घेऊ.
 
शिवसेना : टॉप-10 देणगीदार कंपन्या
बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्स टेक्नोलॉजी लिमिटेडने शिवसेनेला 85 कोटी रुपये दिले. तर क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेडकडून त्यांना 25 कोटी मिळालेत. पीआरएल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने 5 कोटी रुपयांचे बाँड्स दिलेत. टोरेंट पॉवर लिमिटेडनं शिवसेनेला 3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
 
अल्ट्रा टेक सिमेंट लिमिटेड, युवान ट्रेडिंग कन्सल्टन्सी, दिनेशचंद्र आर अगरवाल इन्फ्राकॉन, आणि जेनेक्स्ट हार्डवेअर पार्क्स यांनी प्रत्येकी 3 कोटी रुपये दिलेत. तर महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेडने अडिच आणि बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडने 2 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
शिवसेनेला सर्वाधिक देणगी देणारी बी. जी. शिर्के ही महाराष्ट्रातीलच कंपनी असून, बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्या कंपनी आहे.
 
तसंच, शिवसेनेला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेच्या क्विक सप्लाय चेन कंपनीनेही देणगी दिली आहे. वेअरहाऊसिंग आणि स्टोरेज क्षेत्रात ही कंपनी काम करते.
 
राष्ट्रवादी काँग्रेस : टॉप-10 देणगीदार कंपन्या
राष्ट्रवादी काँग्रेसला देणगी देणाऱ्या कंपन्यांमध्ये टॉपला आहे क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीने त्यांना तब्बल 10 कोटी रुपये दिले आहेत. तर राहुल भाटिया यांनी वैयक्तिक 3.5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. टोरेंट पॉवर लिमिटेडने 3.5 कोटी तर मगरपट्टा टाऊनशिपने 3 कोटींचे बाँड दिले आहेत.
 
महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड 2.5 कोटी रुपये राष्ट्रवादी काँग्रेसला बाँडच्या रुपात दिले आहेत.
 
नांदेड सिटी डेव्हलपमेंट अँड कंस्ट्रक्शन कंपनीने 2 कोटी, बुजा हाऊसिंग अँड अर्बन इन्फ्राने 1 कोटी, सिझकेम प्रायव्हेट लिमिटेड ने 75 लाख, सेझ बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ने 75 लाख तर अंबुजा रिअॅलिटी इव्हेंट्स मॅनेजमेंट लिमिटेडने 50 लाख रुपयांचे बाँड्स राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या इतर इलेक्टोरल बाँड खरेदीदारांमध्ये चंदा इन्व्हेस्टमेंट्स ट्रेंडिंग कंपनी (50 लाख रुपये), गोवा कार्बन लिमिटेड (10 लाख रूपये) आणि व्ही. एम. साळगांवकर कॉर्पोरेशन लिमिटेड (10 लाख रूपये) यांचाही समावेश आहे.
 
राष्ट्रवादीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडशी संबंधित क्विक सप्लाय चेन कंपनीने सर्वाधिक देणगी दिलीय.
 
राष्ट्रवादीच्या देणगीदारांमध्ये मगरपट्टा टाऊनशिपही आहे. मगरपट्टा टाऊनशिप आणि नांदेड सिटी डेव्हलपमेंट अँड कंस्ट्रक्शन्स या दोन कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या सतीश मगर यांच्या असून, सतीश मगर हे आमदार रोहित पवार यांचे सासरे आहेत.
 
भाजपला सर्वाधिक पैसे
भारतीय जनता पार्टीने 60 अब्ज रुपयांहून अधिकची रक्कम निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वटवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आहे. तृणमूल काँग्रेसने 16 अब्ज रुपये किमतीची रक्कम निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वटवली आहे.
 
सर्वांत जास्त निवडणूक रोख्यांची खरेदी फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेसने केली आहे. या कंपनीने एकूण 1368 बाँडची खरेदी केली. ज्यांची किंमत आता 13.6 अब्ज रुपयांहून अधिक आहे.
तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी 14 अब्ज रुपयांचे बाँड वटवले आहेत. त्यानंतर के. चंद्रशेखर राव यांना 12 अब्ज रुपयांचे बाँड वटवले आहेत.
 
त्यानंतर बिजू जनता दलाने 7 अब्ज रुपयांची रक्कम बाँडच्या माध्यमातून वटवली आहे. पाचव्या क्रमांकावर तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष डीएमके आहे तर सहाव्या क्रमांकावर जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस आहे.
या यादीत तेलुगु देसम पार्टी (पॉलिटिकल पार्टी), राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पार्टी, जनता दल सेक्युलर, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, जनसेना पार्टी, अध्यक्ष समाजवादी पार्टी, बिहार प्रदेश जनता दल (युनायटेड) झारखंड मुक्ती मोर्चा, शिरोमणी अकाली दल, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम, शिवसेना, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, जम्मू अँड काश्मीर नॅशनल काँफरन्स, या पार्टींचा समावेश आहे.
 
फ्युचर गेमिंग कंपनीनंतर सर्वाधिक बाँड खरेदी करणाऱी कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही ठरली आहे. मेघा इंजिनिअरिंग कंपनीने 966 कोटी रुपयांचे 966 बॉंड खरेदी केले आहेत.
 
इलेक्टोरल बाँडची सर्व माहिती उघड
भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) निवडणूक रोख्यांशी संबंधित सर्व माहिती निवडणूक आयोगाला दिल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला कळवली.
 
यात रोख्यांशी संबंधित अल्फा-न्यूमेरिक ओळख क्रमांकही समाविष्ट आहेत. ही सर्व माहिती निवडणूक आयोगानं संकेतस्थळावर प्रकाशित केलीय.
 
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 18 मार्च रोजी दिलेल्या आदेशानंतर एसबीआयने निवडणूक आयोगाला रोखे खरेदीदारांची नावे, रोख्यांची रक्कम आणि क्रमांक, रोखे खरेदी करणारे पक्ष, राजकीय पक्षांच्या बँक खात्यांचे शेवटचे चार अंक, वठवलेले रोखे आणि त्यांची रक्कम याबाबतची माहिती दिली होती. निवडणूक आयोगाने ही माहितीही त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केलीय.कोणतीही ओळख उघड न करता राजकीय पक्षांना पैसे देण्याची व्यवस्था म्हणजे निवडणूक रोखे. हे रोखे विकण्यासाठी एसबीआय ही अधिकृत संस्था होती. ही व्यवस्था वित्त अधिनियम 2017 द्वारे लागू करण्यात आली होती. तथापि, त्याच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
 
15 फेब्रुवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांना बेकायदेशीर ठरवलं. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला 12 एप्रिल 2019 पासून ते आतापर्यंत राजकीय पक्षांनी रोख्यांद्वारे वठवलेली सर्व रक्कमेची माहिती निवडणूक आयोगाला देण्याचा आदेश दिला.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments