Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्‍बल २० वर्षांनंतर भारतीय सैन्‍यांना आधुनिक हेल्‍मेट

Webdunia
भारतीय सैन्‍यांना आधुनिक हेल्‍मेट मिळणार आहेत. तब्‍बल वीस वर्षांनंतर जवळपास १.५८ लाख हेल्‍मेट बनवण्‍याचे ऑर्डर देण्‍यात आले आहेत.

हेल्‍मेट बनवण्‍यासाठीच्‍या प्रोजेक्‍टचा एकुण १७० ते १८० कोटी रु. खर्च होण्‍याची शक्‍यता आहे. सैन्‍यांना हेल्‍मेट तीन वर्षांच्‍या आत मिळणार आहेत. हे हेल्‍मेट अभेद्य कवच स्‍वरुपात असून जवानांची सुरक्षा करण्‍यासाठी या हेल्‍मेटमध्‍ये ९ mm च्‍या गोळी झेलण्‍याची क्षमता असते. जवळ असो किंवा दूरवरुन जरी हल्‍ला केला तरी जवानांचे डोके सुरक्षित राहतील. हे हेल्‍मेट बनवणारी एमकेयू इंडस्‍ट्रिज जॅकेट आणि बुलेटप्रुफ जॅकेट बनवण्‍यात वर्ल्ड लीडर आहे. यापुर्वी सरकारने इस्रायलहून १० वर्षांपुर्वी भारतीय जवानांच्‍या स्‍पेशल फोर्ससाठी OR-२०१ हेल्‍मेट्‍स मागवले होते.

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments