आजारी असताना आपण हॉस्पिटल अथवा क्लिनिककडे धाव घेतो. मात्र तेथे उपचार करण्यासाठी डॉकटर आपल्याला किती वेळ देतात, याचा कधी विचार केलाय? नाही ना. मात्र, एका अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात उपचारासाठी डॉक्टर प्रति रुग्णाला सरासरी दोन मिनिटे वेळ देतात. होय केवळ दोन मिनिटेच.
भारताच्या तुलनेत बांगलादेशातील स्थिती अत्यंत बिकट आहे. तेथील डॉक्टर एका रुग्णाला सरासरी केवळ 48 सेकंद वेळ देतात. तर स्वीडनमधील डॉक्टर आपल्या एका रुग्णासाठी तब्बल 22.5 मिनिटांचा वेळ खर्च करतो. यामुळे जगभरातील अर्ध्या लोकसंख्येला डॉक्टर सरासरी 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ देतात.