Dharma Sangrah

आयसिसच्या तीन संशयितांना अटक

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2017 (13:03 IST)
मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून दिल्ली पोलिसांनी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले संशयित दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या पथकाला मिळाली होती.  पोलिसांनी आणखी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाच राज्यांमध्ये गुरुवारी छापे घातले. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आयसिस ही दहशतवादी संघटना हल्ला घडवण्यासाठी नवीन तरुणांची भरती करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments