Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Isro Mission Gaganyaan: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणी लवकरच!

Isro Gaganyan mission
, शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (16:54 IST)
ISRO Mission Gaganyaan: इस्रोचे चंद्र मोहीम, सूर्य मोहिमेनंतर भारताचे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर आता प्रवाशांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सांगितले की, गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणी लवकरच सुरू होणार आहे. 
 
सुमारे 900 कोटी रुपये खर्चाची ही मोहीम पुढील वर्षी सुरू होणार आहे. याआधी यासाठी तीन वाहनांच्या चाचण्या कराव्या लागतील. यापैकी पहिले वाहन चाचणी मिशन TV-D1 असेल, दुसरे TV-D2 मिशन असेल आणि तिसरी चाचणी LVM3-G1 असेल. हे एक मानवरहित मिशन असेल.
 
इस्रोने सांगितले  की लवकरच  गगनयानाच्या चाचणीच्या वाहनाला लॉन्च केले जाईल.    जेणेकरून क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेता येईल. त्यासाठी फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) ची तयारी सुरू आहे.रोबोट आणि ह्युमनॉइड्स (मानवासारखे रोबोट) अवकाशात पाठवून क्रूच्या सुरक्षेची खात्री केली जाणार आहे. गगनयानच्या तिसर्‍या वाहन चाचणी, LVM3-G1 अंतर्गत पाठवल्या जाणार्‍या ह्युमनॉइडद्वारे क्रूसमोरील सर्व आव्हानांची माहिती गोळा केली जाईल.
 
या मोहिमेसाठी अंतराळवीरांना प्रशिक्षण देत आहे. ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना 400 किमीच्या कक्षेत पाठवून त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले जाईल. हटन म्हणाले होते की गगनयानचे चाचणी वाहन पुढील महिन्यात लाँच केले जाईल जेणेकरून क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेता येईल.
 
या सिस्टीमचा वापर आपत्कालीन परिस्थितीतून अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी केले जाऊ शकते. हटन यांनी सांगितले होते की, गगनयानच्या सध्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. हटन म्हणाले होते की अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे, चाचण्यांद्वारे आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की क्रूला कोणतीही हानी होणार नाही. 








Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asian Games 2023: पुरुषांच्या कबड्डीच्या अंतिम फेरीत भारताने इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले