Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इस्त्रोने केले 31 उपग्रहांचे प्रक्षेपण

Webdunia
इस्त्रोने शुक्रवारी सकाळी PSLV-C38  रॉकेटव्दारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी PSLV-C38 रॉकेटने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केले. त्यानंतर 16 मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - 2 मालिकेतील उपग्रहासह अन्य 29 नॅनो उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे 40 वे उड्डाण होते. 31 उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि 29 परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट -2 मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन 712 किलो असून, अन्य 30  उपग्रहांचे मिळून 243 किलो वजन आहे.  यात   फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान असे 14 देशांचे 29 नॅनो उपग्रह सुद्धा प्रक्षेपित करण्यात आले आहेत. इस्त्रोने याआधी फेब्रुवारी महिन्यात एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments