Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जम्मू आणि काश्मीर: एनआयएच्या दहशतवादी निधी प्रकरणात मोठी कारवाई, 40 पेक्षा जास्त ठिकाणी छापे

Webdunia
रविवार, 8 ऑगस्ट 2021 (12:51 IST)
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी (जेईआय) च्या परिसरात विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.सीआरपीएफ आणि पोलिसां बरोबरच एनआयएचे ऑपरेशन श्रीनगर,गंदरबल, अचबल,शोपियां,बांदीपोरा,रामबन,दोडा,किश्तवाड,राजोरी यासह राज्यातील 40 हून अधिक ठिकाणी कारवाई सुरू आहे.
 
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी निधी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने रविवारी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने जम्मू-काश्मीरमधील सुमारे 40 ठिकाणी छापे घातले असून प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनगरमधील सौरा येथील रहिवासी गाझी मोईन-उल इस्लाम आणि नौगाम येथील फलाह-ए-आम ट्रस्टच्या घरी छापे टाकले जात आहेत. 
 
अनंतनाग जिल्ह्यातील मुश्ताक अहमद वानी पुत्र गुलाम हसन वानी,नझीर अहमद रैना पुत्र गुलाम रसूल रैना, फारूक अहमद खान पुत्र मोहम्मद याकूब खान आणि अफताक अहमद मीर,अहमदउल्ला पारे यांच्या ठिकाणीही छापे सुरू आहेत.
 
बडगाम जिल्ह्यातील सोईबग येथील रहिवासी डॉ.मोहम्मद सुलतान भट, गुलाम मोहम्मद वानी आणि गुलजार अहमद शाह यांच्यासह जमातच्या अनेक नेत्यांच्या निवासस्थानी छापे टाकले जात आहेत. बांदीपोरा येथील जमातच्या माजी अध्यक्षांच्या निवासस्थानाची झडती घेतली जात आहे. मोहम्मद सिकंदर मलिक पुत्र अब्दुल गनी मलिक रहिवाशी गुंडपोरा अशी त्याची ओळख आहे. त्याचप्रमाणे गांदरबल, शोपियां, कुलगाम,बारामुल्ला,पुलवामा, रामबन,डोडासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये छापे सुरू आहेत. 2019 मध्ये केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती,परंतु त्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये संघटनेचे उपक्रम सुरू होते. एनआयएच्या टेरर फंडिंग प्रकरणात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. 
 
यापूर्वी 31 जुलै रोजी एनआयएने दहशतवादाशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये जम्मू -काश्मीरमधील 15 ठिकाणी छापे टाकले होते. लष्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख हिदायतुल्लाह मलिकला अटक करणे आणि जम्मू हवाई दल स्टेशनवरील हल्ल्यापूर्वी पाच किलो आयईडी जप्त करण्याशी संबंधित प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली. 
 
छाप्यांदरम्यान एका आरोपीच्या अटकेबरोबरच डिजिटल उपकरणे, मोबाईल, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड,पेन ड्राइव्ह,लॅपटॉप,बुलेट खोके,दगडफेकीच्या वेळी ओळख लपवण्यासाठी वापरलेले प्लास्टिक चे मुखवटे, हस्तलिखित  जिहादी पत्रकेआणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments