जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये आयटीबीच्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली.या अपघातात 4 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात अनेक जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक बस आयटीबीपीच्या जवानांना चंदनवाडीहून पहलगामला घेऊन जात होती. ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली. बसमध्ये 39 जवान होते. 37 जवान आयटीबीपीचे तर दोन जवान जम्मू-काश्मीर पोलिसांचे होते.
<
Jammu & Kashmir | A number of ITBP jawans feared injured after the vehicle they were travelling in rolled down the road at Frislan, Pahalgam. The jawans were deputed in the area for Amarnath Yatra.
— ANI (@ANI) August 16, 2022
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
सर्व जवान अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवर होते असे सांगण्यात येत आहे. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. यादरम्यान ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली, बचावकार्य सुरू आहे.