Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका

Webdunia
बुधवार, 14 जून 2017 (17:23 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका बसला. बोर्डिंग पास घेऊनही राजू शेट्टी यांना न घेताच विमानाने उड्डाण केलं. याप्रकरणात  राजू शेट्टी हे मुंबईहून दिल्लीला जात होते. त्यांनी  विमानाचं बिझनेस क्लासचं तिकीट घेतलं. ते तासभर आधीच मुंबई विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर त्यांनी रितसर बोर्डिंग पास घेतला होता.  प्रवासाला वेळ होता म्हणून ते लॉन्जमध्ये येऊन बसले. त्यांनी रजिस्टरमध्ये नोंदही केली. खासदार राजू शेट्टी हे कधीही प्रोटोकॉल घेत नाहीत. तसेच मदतनीसही घेत नाही. काही वेळाने ते बोर्डिंगसाठी लॉन्जबाहेर आले. मात्र बोर्डिंगद्वार बंद झाल्याचे त्यांना कळवण्यात आले.  बोर्डिंग पास घेतलेला असूनही असे विसरुन जाणे हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.  मात्र जेट एअरवेजने थेट हात वर केले.  त्यावेळी जेट एअरवेजने बदली तिकीटासाठी  दोन हजार रुपये वसूल केले.

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments