Marathi Biodata Maker

महिना अखेरपर्यंत कमल हसनकडून नव्या पक्षाची घोषणा

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:42 IST)

अभिनेते कमल हसन  या महिन्याच्या शेवटपर्यंत  नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तामिळनाडूत नोव्हेंबर महिन्यात स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये कमल हसन आपल्या समर्थकांना उतरवणार असल्याले म्हटले जात आहे.

याच संदर्भात एका मुलाखतीत कमल हसनने म्हटलं होतं की, मला माझ्या पक्षाची निर्मिती करायची आहे. ६२ वर्षीय सुपरस्टार कमल हसन म्हणतात, हा, मी याच दिशेने विचार करत आहे मात्र, इच्छेमुळे नाही तर नाईलाजाने मला यासंदर्भात विचार करावा लागत आहे. यावेळेला कोणता असा पक्षा आहे जो राजकारणात माझ्या सुधारवादी उद्देशांना पूर्ण करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देईल.  ला सत्तेत येण्यासाठी मतं देऊ नका कारण एकदा सत्तेत आल्यावर मला हटविण्यासाठी पून्हा पाच वर्ष वाट पहावी लागेल. जर मी काम केली नाही तर मला तात्काळ पदावरुन दूर करा. हाच एक उपाय आहे. ज्याच्यामुळे देशातील राजकारणात बदल होऊ शकतो असेही कमल हसनने म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments