Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कन्हैय्या कुमारकडून पंतप्रधान मोदींना टीका

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:26 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिटलर बनण्याचं स्वप्न पाहू नये. तुम्ही ना हिटलर आहात, ना आम्ही गॅस चेंबरमधील यहुदी. आम्ही लढून मरु, पण झुकणार नाही, असा घणाघात विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने अहमदनगरमध्ये केला. यावेळी कन्हैय्याने पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली.

“नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून अंबानी आणि अदानीचे प्रचार मंत्री आहेत. नीता अंबानींबरोबर फोटो काढतात तर जाहिरात का नाही करणार?”, असा सवाल कन्हैया कुमारने केला. “पंतप्रधान सरकारी कंपनीची जाहिरात करत नाहीत. मात्र खासगी कंपनीचा प्रचार करतात”, असा आरोप कन्हैयाने केला. अहमदनगर लाँग मार्चच्या सभेत तो बोलत होता.

यावेळी कन्हैयाने आरएसएसच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. देशभक्तीचा नारा देणाऱ्या संघाच्या किती जणांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलंय?, असा सवाल कन्हैय्याने केला. शिवाय, भगव्या दहशतवादाविरोधात सर्वांनी इंद्रधनुष्यासारखं एकत्रित लढण्याचं आवाहनही कन्हैय्याने केलं.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments