Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

कर्नाटकात एकहाती सत्ता नाही, सट्टाबाजार गरम

karnataka vidhansabha
, बुधवार, 9 मे 2018 (16:39 IST)
कर्नाटक विधानसभा निवडणूक अगदी जवळ आली आहे.  कर्नाटकची सत्ता कोण काबीज करणार, याची सर्वांनाच  उत्सुकता आहे. विविध सर्वेक्षणांची आकडेवारीही समोर आली असून, सर्वच सर्वेक्षणांमध्ये कल वेगवेगळा दिसत आहे. अशातच सट्टा बाजारानेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवला दिल आहे. त्यानुसार कर्नाटकात लढाई जोरदार होणार आहे. मात्र  कुणालाही एका पक्षाला  बहुमत मिळणार नाही. तरीही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, तर त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असणार असून, जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर रहणार आहे, सत्तेची चावी त्यांच्या कडे असणार आहे. अंदाज सट्टा बाजारात वर्तवला जातो आहे. भाजपला 92-94 जागांवर विजय मिळेल, काँग्रेसला 89-91 जागांवर विजय मिळेल, तर जेडीएसला 32-34 जागांवर विजय मिळणार असा अंदाज आहे.
 
सट्टा बाजाराची अंदाजित आकडेवारी पाहता कुणीही एकहाती सत्ता मिळवू शकत नाही. कारण कर्नाटकच्या 224 जागांच्या विधानसभेत 113 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मात्रोश्रीवर पंकज भुजबळ यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट