Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मात्रोश्रीवर पंकज भुजबळ यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट

मात्रोश्रीवर पंकज भुजबळ यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत  भेट
, बुधवार, 9 मे 2018 (16:36 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी मातोश्री येथे भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती, त्यांनी रुग्णालयातून कामाला सुरुवात देखील केली आहे. मात्र या दोघांच्या भेटीने राजकारण बदलणार आहे.
 
ठाकरे - भुजबळ यांची जवळपास 15 मिनिटं  भेट झाली, या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर देखील  होते. मात्र पंकज भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट होती असे सांगण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत येण्याआधी शिवसेनेत होते. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवसेना आणि भुजबळ कुटुंबीय यांच्यातील संबंध नेहमीच राजकीयदृष्ट्या तणावाचेच राहिले आहेत. मात्र भुजबळांच्या जामिनावर सुटकेनंतर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भुजबळांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आधीच राजकीय चर्चांना वेग आला होता. 
‘सामना’त  भुजबळांबद्दल काय म्हटले होते?

“भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र सदन उभारण्यात घोटाळा झाला नसल्याचे सत्य तेव्हा फक्त ‘सामना’नेच छापले. आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाही. भुजबळ सुटले. त्यांच्या कुटुंबीयांना नक्कीच आनंद झाला असेल. भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. ते जामिनावरच सुटले आहेत याचे भान त्यांनी सदैव ठेवायला हवे. सुज्ञांस अधिक काय सांगावे!”, असे सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे नवीन राजकारण तयार होते की दुसरे अजून काही कारण आहे, हे पुढे समोर येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अकबर रोड आता महाराणा प्रताप रोड...